सार्वजनिक अभ्यासिका निर्माण करण्यासाठी सिरोंचा नगरपंचायत उदासीन! मुख्याधिकाऱ्याना निवेदन bhi

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिरोंचा-गडचिरोली, दि. २१ सप्टेंबर : सिरोंचा नगरपंचायत होवून ६ वर्ष झाली. सन २०१८-१९ साली नगरपंचायत स्थापन झाली. पण अध्यापपर्यंत वेळोवेळी विध्यार्थ्यांनी मागणी करूनही सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका अथवा ग्रंथालय निर्माण करण्यात सिरोंचा नगरपंचायत अपयशी ठरली आहे.

भारतीय संविधानानुसार भाग ९ समाविष्ट कलम २४३G( छ) अन्वये नगरपंचायती कार्यप्रणालीत नगरपंचायतीच्या अधिकार व जबाबदाऱ्यांची स्पष्टता दिली असून , १३ वी जबाबदारी ही स्थानिक नागरिकांसाठी तथा विध्यार्थ्यांसाठी सार्वजनिक अभ्यासिका निर्माण करणे अशी तरतूद केली आहे. तरी देखील आजतागायत सार्वजनिक अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय निर्माण करण्यात आली नाहीत. ही संवैधानिक कलमांची उल्लंघणाची बाब आहे. तरी स्थानिक विद्यार्थ्यांचा तथा स्पर्धापरीक्षकांचा शैक्षणिक विचार दृष्टीस ठेवून येत्या १५ दिवसात सार्वजनिक अभ्यासिका निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सिरोंचा असे नाव देण्यात यावे.असे निवेदन स्पर्धा परीक्षक विध्यार्थी, व वाचन प्रेमी यांनी मुख्याधिकारी सिरोंचा नगरपंचायत यांना दिले।आहे. त्याचप्रमाणे त्याची प्रतिलिपी नगराध्यक्ष, सिरोंचा नगरपंचायत, तहसीलदार सिरोंचा, उपविभागीय अधिकारी अहेरी, अप्पर जिल्हाधिकारी अहेरी, जिल्हाधिकारी अहेरी यांनाही देण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

महाराष्ट्रातील भूमीपुत्रांवर अन्याय, प्रकल्प महाराष्ट्रात आणि नोकरीच्या मुलाखती चेन्नईत

 

lead newssironcha