स्थानिक प्रमुखांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

परभणीच्या जिंतूर येथिल घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

परभणी, दि. ३१ डिसेंबर: परभणीच्या जिंतूर आगारात कार्यरत असलेल्या 32 वर्षीय चालकास स्थानक प्रमुख, सहाय्यक वाहतूक नियंत्रक व वाहन परिवेक्षक यांच्याकडून नियमितपणे जाणून बुजून मानसिक त्रास होत असल्याने चालकाने स्वतःच्या हाताची नस कापून जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

नातेवाईकांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून त्या चालकास परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Sucide Case