शहरातील हायमास्ट व पथदिवे कित्येक महिन्यापासून बंद असल्याने मेणबत्ती पेटवून केला नगरपंचायत चा निषेध

अहेरीत भाजपा कार्यकर्त्यांनी केले अभिनव आंदोलन

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी:३१ जुलै अहेरी(Aheri) शहरातील मुख्य चौकातील हायमास्ट लाईटसह अनेक स्ट्रीट लाईट (पथदिवे) गेल्या १० महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत, ह्यामुळे शहरात सर्वत्र  अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, ह्याबाबत भाजपा अहेरी तर्फे निवेदन देऊन वारंवार दुरुस्त करण्याची मागणी केल्यावरही अहेरी नगरपंचायत प्रशासना तर्फे  या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, ह्यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास  होत आहे, ह्या समस्येची दखल घेत भाजपा अहेरी तर्फे शुक्रवारी संध्याकाळी कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातील हायमास्ट समोर मेणबत्ती पेटवुन   हायमास्ट लाईटला श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच ह्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी अहेरी नगर पंचायत(Aheri Nagarpanchyat) प्रशासना विरुद्ध प्रचंड नारेबाजी करून झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न करीत, अभिनव पद्धतीने अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा निषेध केला.

ह्यावेळी भाजपा अहेरी तालुका तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री शंकर मगडीवार,  तालुका महामंत्री पप्पू मद्दीवार, मुकेश नामेवार, भाजयुमो जिल्हा सचिव विक्की तोडसाम, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, प्रशांत नामनवार, उमेश गुप्ता, चंद्रिका प्रसाद गुप्ता, संतोष दोंतुलवार, राकेश गुप्ता, सागर गुप्ता, दिलीप गुब्बावार सह अहेरी शहरातील भाजपा पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

 

हे देखील वाचा :

वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई

 

…अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून

 

AheriAHERINAGRPNCHYATBJPWORKERSPROTEST