राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली : शिकारीसाठी लावलेल्या ११ के.व्ही. चा विद्युत प्रवाह लागून ३ म्हशी ठार झाल्या आहे. ही घटना आलापल्ली – चंद्रपूर मार्गावरील फुलसिंगनगर नजीक असलेल्या वनविकास महामंडळाच्या लाकुड डेपोच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गालगत आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेत ठार झालेल्या म्हशी या मोदुमोडगु येथील मल्लेश गुरुडवार यांच्या मालकीच्या आहेत. काल दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे गुरुडवार यांच्या मालकीच्या म्हशी जंगलात चरण्यासाठी गेल्या होत्या. मात्र संध्याकाळपर्यंत त्या परत न आल्याने त्यांनी म्हशीची शोधाशोध केली. मात्र म्हशींचा पत्ता लागला नाही.

आज सकाळच्या सुमारास वनविकास मंडळाच्या लाकूड डेपो नजीक ३ म्हशी मृतावस्थेत पडलेल्या आहेत. अशी माहिती त्यांना मिळाली असता घटनास्थळावर जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्या म्हशी त्यांच्याच मालकीच्या असल्याचे लक्षात आले.

विद्युत प्रवाह लागून म्हशी ठार झाल्यामुळे गुरुडवार यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. कारण त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशींचे दुध विक्री करून होत असे. त्यामुळे याची नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गुरुडवार यांनी केली आहे.

आलापल्ली वनविभागाच्या जंगलात शिकारी लोक वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी विद्युत प्रवाह लावून सापळा रचतात. त्यामुळे अनेकदा वन्यप्राण्यांसोबत जंगलात चरायला जाणारे गुरे-ढोरे-म्हशी सापळ्यात अडकून त्यांच्या मृत्यू होतो. नजीकच्या काळात मुख्य मार्गा नजीक लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या सापळ्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने व महावितरणने या भागात गस्त वाढवून शिकारीला आळा घालण्याची जनतेकडून मागणी होत आहे.

हे देखील वाचा :

वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले अखेर जीवदान

धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू

राज्यपालांनी पाठवले ठाकरे सरकारला पत्र, मुख्यमंत्र्यांना करून दिले स्मरण

3 buffalo deathForest Departmentlead storymahavitran