अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. २८ ऑक्टोंबर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचा-यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

सन २०२१-२०२२ या वित्तीय  वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण ३७ कोटी ९७ लाख ३२ हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट अदा करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

ऑनलाइन सट्टावर पोलिसांची धाड! ३०,०९,४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

आदिवासी बांधवांबरोबर बसून प्रश्न जाणून घेता आले – राज्यमंत्री तनपुरे

@AdvYashomatiINC