माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या रुग्णवाहिकेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली ३० ऑगस्ट : माँ विश्वभारती सेवा संस्था व व्यापारी संघटना आलापल्ली यांच्या सहयोगाने लोकवर्गणीतुन रूग्णवाहिकेचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वीर बाबूराव चौकात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गडडमवार,माँ विश्व भारती संघटनेचे तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे,व्यापारी संघटनेचे  उपाध्यक्ष अमोल कोलपकवार,अहेरी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडदे,माँ विश्वभारती संस्थे चे गंगाधर रंगूवार, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खोंड,जहांगीर शेख,अशोक येलमुले,विजय खरवडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुश्ताक हकीम,अमूल गुप्ता आदींची उपस्थिती होती.

कोरोना च्या लॉकडाऊन काळात माँ विश्वभारती सेवासंस्थे तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.3000 च्या वर अन्नधान्य किट वाटप,बाहेरगावाहून आलेल्या लोकांना पोळी भाजी चे वाटप, गोरगरिबांना कपडे वाटप  आदी उपक्रम कोरोना काळात राबविण्यात आले होते.

अहेरी उपविभागातील आलापल्ली हे मध्यवर्ती गाव आहे  त्यामुळे अनेकदा आजूबाजूच्या परिसरात कुठे अपघात झाला किंवा कोणत्याही रुग्णाला आपात्कालीन वेळी या ठिकाणी रुग्णवाहिका नसल्याने वेळीच दवाखान्यात दाखल करता येत नव्हते त्यामुळे अनेकदा वेळेवर उपचाराअभावी प्राण गमवावे लागत होते.त्यामुळे माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या सदस्यांना आलापल्ली येथे रुग्णवाहिका असली पाहिजे जी 24 तास सेवेत राहिली पाहीजे  या हेतूने लोकवर्गणी जमा करून रुग्णवाहिका आणायचे ठरवले त्या नुसार विविध माध्यमातून मदतीचे आवाहन करून लोकवर्गणी जमा करून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली. त्यानुसार आज त्याचे लोकार्पण करण्यात आले.

 

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात 426 तपासण्यांपैकी 4 कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त

ajayknkdalwarambulanceingurationmaavishwbharatisewasanstha