शासकीय आश्रमशाळेतील तब्बल १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा

आश्रमशाळेतील व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दिं २० : धानोरा तालुक्यातील सोडे येथील मुलींच्या शासकीय आश्रम शाळेतील तब्बल १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या सर्वांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यातील ४७ विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.विषबाधाच्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या दुर्घटनेमुळे आदिवासी विकास प्रकल्पांमधील आश्रमशाळेतील व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.सोडे आश्रमशाळेत आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुपारचे जेवण केल्यानंतर काही वेळातच मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर आश्रम शाळेतील शिक्षकांनी बाधित मुलींना उपचारासाठी धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच आणखी मुलींना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत १०५ पेक्षा जास्त मुलींना
विषबाधा झाली. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला आहे. या सर्व मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यातील काही मुलींना उपचारानंतर सुटी
देण्यात आली. मात्र यातील ४७ मुलींची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आश्रम शाळेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाच्या वतीने काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

 

 

 

गडचिरोली उपविभागीय दंडाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकारीगडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोलीतहसीलदार धानोरातालुका आरोग्य अधिकारी धानोरा