2 हजारांच्या नोटबंदीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

असं सरकार चालतं का?
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक , 20 मे – रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर तज्ज्ञांशी बोलून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळच आली नसती, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून राज ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.  हा धडसोडीचा प्रकार आहे. अशानं सरकार चालणार आहे का? मी त्याचवेळी बोललो होतो, जर तज्ज्ञांना विचारून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली असती तर आज ती बंद करण्याची वेळ आली नसती असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेली त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नोटाबंदीवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. नोटाबंदी झाली त्याचवेळी मी बोललो होतो. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारून नोटाबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती. तेव्हा नोटा आल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नोट एटीएममध्ये जाईल की नाही याचा विचारही तेव्हा केला नव्हता. असले निर्णय परवडणारे नसतात. उद्या बँकेत पैसे टाकायचे. नंतर नवीन नोट आणणार. असं काही सरकार चालतं का? असे थोडे प्रयोग होतात. मी तेव्हाच या गोष्टी बोललो होतो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.