ताडोबाच्या नंदनवनात पुन्हा एकदा ब्लॅक ब्यूटीचे दर्शन

काळ्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटक आनंदित,  ताडोबातील पर्यटन हंगाम आलाय तेजीत, ताडोबातील पर्यटकाने टिपलेले सौंदर्य होतेय वायरल, ऐटदार चाल आणि चित्तवेधक उडी झाली कॅमेऱ्यात कैद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. १६ डिसेंबर :  चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून काळा बिबट्या वास्तव्यास आहे. कोरोना काळामुळे ताडोबातील पर्यटन हंगाम विस्कळीत झाला होता. एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ताडोबातील नव्या पर्यटन हंगामाने सध्या उंची गाठली आहे.

पर्यटकांना काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटक आनंदित झाले. हा बिबट्या येथे दिसू लागला तेव्हापासून त्याचं पर्यटकांना भारी आकर्षण आहे. पण त्याचं दिसणं फार दुर्मिळ आहे. मोठमोठे सेलिब्रेटी त्याला बघण्यासाठी येथे हजेरी लावून गेले. मात्र हा बिबट्या काही दिसला नाही. ताडोबात दाखल झालेल्या पर्यटकांना नुकतेच याचे दर्शन झाले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रस्ता ओलांडताना त्याची ऐटदार चाल आणि चित्तवेधक उडी व्हीडिओत बघायला मिळते आहे.

हे देखील वाचा : 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पोलीस दादालोरा खिडकी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

 

lead newsTadoba Tiger Project