गुरवळा नेचर सफारीला तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी कोईमतुर मधील प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि १ जुलै : गडचिरोली वन विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या  गोंडवाना हर्ब अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची भेट घेत  माहिती घेतली असून  प्रशिक्षणार्थींना गोंडवाना हर्ब मध्ये तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वनौषधींची माहिती देण्यात आली. शिल्प ग्राम येथे भेटती दरम्यान शिल्प ग्राम मध्ये सुरू असलेल्या युवकांच्या प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली.गुरवळा नेचर सफारी येते प्रशिक्षणार्थींना नेचर सफारी बाबत माहिती देण्यात आली व नेचर सफारीमुळे वनांचे संरक्षण व संवर्धन झाले सोबत स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध झालेला आहे असे सांगण्यात आले.

तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी कोईमतुर येथील  मनोज के व दिलीपण यांचे नेतृत्वात ४७ प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी भेट दिली. प्रशिक्षणार्थींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील २२ व उत्तर प्रदेश राज्यातील २५  प्रशिक्षणार्थी होते . गडचिरोली वनविभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. प्रशिक्षणार्थींना मिलिश शर्मा सर उपवनसंरक्षक गडचिरोली वन विभाग गडचिरोली. सोनल भडके सर सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली, यांनी मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षणाला निलेश गेडाम अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरुवडा व श्री रमेश मेश्राम अध्यक्ष संयुक्त व्यवस्थापन समिती हिरापूर ,श्रीकांत नवघरे क्षेत्र सहाय्यक गडचिरोली, गुरु वाढई वनरक्षक गुरवडा यांनी सहकार्य केले.

Lead newd dr kishor mankar