केंद्रीय तपास यंत्रणांकडून माझ्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा; आमदार गीता जैन यांचे राष्ट्रपती यांना पत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मीरा भाईंदर, दि. २४ मे : माझ्या कुटुंबाच्या संपत्तीची केंद्रातील सर्व तपास यंत्रणांकडून चौकशी करा अशी मागणी मीरा भाईंदर शहराच्या आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.या संदर्भात त्यांनी देशाचे थेट राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना लेखी पत्र दिले आहे.गीता जैन यांनी दिलेल्या पत्रामुळे शहरात एकच चर्चेला उधाण आले आहे. तर समाज माध्यमातून टीका करणारे विरोधक यांना चांगलीच चपराक बसली आहे.

भाजप सरकार नसलेल्या राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात केंद्रीय यंत्रणा धाडी पडत आहेत.त्यातच महाराष्ट्र राज्यात धाडी टाकण्याचे प्रमाण जास्त आहे.सेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी व कुटुंबातील सदस्य यांच्यावर सीबीआय, आयकर विभाग,ईडी सारख्या तपास यंत्रणा छापेमारी करत आहे.आमदार गीता जैन हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत.त्यानंतर शिवसेनेला समर्थन दिले आहे.त्यातच शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या घरी छापेमारी सुरू असताना,मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी स्वतःच्याच कुटूंबाची संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करा असे खुले आव्हान केले आहे.त्यामुळे या पत्राची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा

 

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याचा Video व्हायरल

 

lead news