पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात बिबट्या ठार

गडचिरोली वनपरिक्षेत्रातील घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली वनविभागात वाघ-बिबट या हिस्त्र प्राणीशिवाय इतरही प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आज वाघ-बिबट यांच्या हल्ल्यात बिबत ठार झाल्याने सदर घटनेत वाघ आणि बिबट यांच्या झुंजीत वाघाने बिबट्याला ठार केला असला तरी बिबट्यानेही वाघाला जखमी केले असावे असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वनाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. मृत बिबट्या असलेल्या घटना स्थळाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात  वाघ व बिबट्याच्या पदमार्क आढळून आले आहे. गावकऱ्यानी जंगलात जाऊ नये तसेच आपले पाळीव प्राणी जंगलात चरायला घेऊन जावू नये. असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले आहे. 

गडचिरोली, दि. २६ जून :  येथील वनपरिक्षेत्रात येत असलेल्या  कक्ष क्रमांक 171 मध्ये वन कर्मचारी गस्ती करीत असतांना आज सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास बिबट मृत अवस्थेत आढळून आले असता घटनेची माहिती वन कर्मचाऱ्यांनी उप वनसंरक्षक, गडचिरोली मिलिश दत्त शर्मा यांना देण्यात आली.

त्यावेळी गडचिरोली उप वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात सोनल भडके, सहायक वनसंरक्षक, अरविंद पेंदाम, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीकांत नवघरे, क्षेत्रसहायक,  बि.पी. राठोड, वनरक्षक, भसारकर, वनरक्षक बोदली, गौरव हेमके, वनरक्षक चांदाळा व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी / कर्मचारी यांनी घटन स्थळावर जाऊन पाहणी केली असता, सदर घटनास्थळ कक्ष क्रमांक 171 मधील वाकडी गावालगतच्या झुडपी जंगलात घडली असुन मौका स्थळाची पाहणी केली असता, मृत बिबटच्य शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळुन आले तसेच मृत शरीर असलेल्या आजुबाजुच्या परिसरात पटटेदार वाघाचे पाऊलखुना आढळुन आल्या तसेच जवळच पटटेदार वाघ व बिबट यांच्यात झुंज झाल्याचे निशान दिसुन आले.  त्यामुळे सदर बिबट वन्यप्राणी हा वाघाच्या हल्ल्यात मृत झाल्याचे प्रथम दर्शनी अंदाज  व्यक्त करण्यात आला.

सदर प्रकरणात शवविच्छेदन करण्याकरीता पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1, येवली डॉ. चेतन नंदनवार व पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1, गुरवळा डॉ. श्रध्देय सिरणकर उपस्थीत होते. दोनही अधिकाऱ्यांनी मृत शरीराची शवविच्छेदन करुन रासायनिक तपासणी करीता नमुने घेतले आहे. मृत बिबटयाच्या शरीरावरील जखमावरुन पटटेदार वाघाने हल्ला करुन बिबटयास ठार केल्याचे प्राथमिक अंदाज डॉ. चेतन नंदनवार व डॉ. श्रध्देय सिरणकर यांनी व्यक्त केला. सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकड़कर तसेच ग्रामपंचायत वाकडी येथील सरपंच सरिता भास्कर चौधरी व पोलीस पाटील देवेंद्र केशव वाकडे हे सुध्दा उपस्थीत होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करुन मृत शरीरास अग्नी देऊन उपरोक्त सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.

सदर प्रकरणावरुन वाघ व बिबट यांच्यात झुंज झाली असल्याने वाघ सुध्दा यात जखमी झालेला असावा असे प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला असुन घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगला परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली अरविंद पेंदाम यांनी केलेले आहे.
सदर घटनेची चौकशी उप वनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली  अरविंद पेंदाम हे करीत आहे.
lead newsmilish sharmaSonal Bhadke