किमान कौशल्य विकास कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 24 मार्च : जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांचे मार्फत “किमान कौशल्य विकास कार्यक्रम” सन 2021-22 करीता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण पुर्नत: निशुल्क असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे.

दहावी,बारावी,पदविधर,पॉलीटेक्नीक,आयटीआय,इंजिनिअरींग,डिप्लोमा,कृषी,फार्मसी तसेच सर्व शाखेतील उमेदवार या प्रशिक्षणाकरीता पात्र असून प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांनी सकाळी 11 ते 6 वा. यादरम्यान प्रा.श्री.कांगे व प्रा.श्री. ठवरे (9422634002) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

कोर्सचे नाव व संख्या पुढील प्रमाणे:– ज्यूनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर-30,सेक्यूरिटी ॲनालिस्ट-30,कॅन्सल्टंट नेटवर्क सेक्यूरिटी-40,सेक्यूरिटी ईनफारस्ट्रक्चर स्पेशालिस्ट-40,अप्लीकेशन डेव्हलपर-वेब ॲन्ड मोबाईल-40, क्लाऊड अप्लीकेशन डेव्हलपर-40,आयओटी-टेस्ट ॲनालिस्ट-40,आओटी-हार्डवेअर सोल्यूशन डिझायनर-40, सॉफ्टवेअर डेव्हलपर-40,डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर-20,असोसिएट-डेक्सटॉप पब्लीश्यिाग डिटीपी -20,

अधिक माहिती व नोंदणी करीता जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल, बॅरेक क्रमांक-2 युनिट क्र.-2,कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे प्रत्यक्ष किंवा सकाळी 11 ते 6 वा. या वेळेत कार्यालयाचे दूरध्वनी क्र. 07132-295368 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त जि.कौ.वि.रो.व.उ.मा.के. गडचिरोली यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी !: नाना पटोले

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या करणाऱ्या 22 वर्षीय प्रियकराला अटक

खुशखबर!!गडचिरोली पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी गृह विभागाची मंजुरी, पोलीस पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

 

lead news