आमदारांना मोफत घरे कशासाठी मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

 

  • कोरोनामुळे तिजोरी खाली-झाली सांगायचे आणि एकीकडे घरे वाटत सुटायचं कशासाठी..?
  • सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज दया व जनतेचे आशीर्वाद मिळवा -आमदार राजू पाटील

मुंबई डेस्क दि,२५ मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत ३०० आमदारांना घरे देणार असल्याचे सांगितले.यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आमदारांना घरे कशासाठी असा सवाल राज्य सरकारला केला आहे.

एकीकडे कोरोनामुळे सरकारची तिजोरी खाली झाली आहे असे सांगायचे आणि एकीकडे अशी घरे वाटत सुटायचं.यासंदर्भातील घोषणा सरकार ने केल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सरकार वर टीकेची झोड उठवली जात आहे.तसेच टिका करणारे सरसकट आमदारांना शिव्या घालतात त्यामुळे अशा गोष्टीन मध्ये न जाता हा खर्च इतर ठिकाणी आपण करू शकता असे सांगत मनसे आमदार पाटील यांनी हे ट्विट केले आहे.

हे देखील वाचा,

क्षयमूक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा – डॉ. रुडे

धक्कादायक! तीन शाळकरी मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू; गावावर पसरली शोककळा

आशाताई आरोग्य सेवेचा कणा – कुमार आशीर्वाद

 

Clead stori narendra modi M Uddhav Thakarey