बुद्ध पौर्णिमेला रात्री मचानवर बसून पर्यटकांसह प्राणी निरीक्षकांनी अनुभवले रोमांचक क्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. खरंतर वैशाख महिन्यातील उन्हाच्या तीव्र झळांमुळे पाणवठ्यावर प्राणी येतात. त्यामुळे त्यांची गणना करण्यासाठी ही अत्यंत उत्तम संधी ठरते. यासाठी वन विभागातील कर्मचारी दुपारपासूनच यासाठी तयारी करतात. यामध्ये प्राणी मित्रांनाही सहभाग घेता येतो.

गडचिरोली दी १७ में :- गडचिरोलीच्या नजीक असलेल्या गुरवळा नेचर सफारी येथे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पर्यटकांसाठी मचाणवर निसर्ग अनुभव व प्राणी निरीक्षणाचे आयोजन गडचिरोली वनविभागाच्या वतीने करण्यात आले होते.पाणवठ्या जवळच्या मचाणावर बसून प्राणी निरीक्षणाचा आनंद २० पर्यटकांनी घेतला.

 

यावेळी रात्रीच्या प्रकाशात पर्यटकांना बिबट,अस्वल, राणकुत्रे, रानडुक्कर, चितळ,नीलगाय,चौसिंगा,कोल्हा ,ससा आदी. वन्यप्राण्यांचे दर्शन  घेवुन प्राणी निरीक्षणाचा अनुभव रोमांचकारी असल्याचे रात्रीच्या वेळी मचानवर बसलेल्या पर्यटकांनी व्यक्त केले.

हा रोमांचक क्षण प्राणी निरीक्षणाचा अनुभव डॉ.रविंद्र चौधरी, मिना रविद्र चौधरी, देवेद्र कामडी,सूचिता देवेंद्र कामडी, प्रमेश उराडे. ब्रिजेश नागदेवते,चेतन शेंडे, अजय कुकडकर, वन्यजीव प्रेमी,महेश वाला, किशोर खेवले, होमदेव कोसमशिले, योगेश हजारे ,होमदेव कुरवटकर यांनी मनसोक्त आनंद घेतला असून समाधान व्यक्त केले आहे.

गुरवळा नेचर सफारी मध्ये प्राणी निरीक्षणाचा कार्यक्रम गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उप वनसरंक्षक
मिलिश शर्मा,जमीर शेख, (भावसे) गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्ये नेतृत्वात राबविण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. एस.बी.पड़वै, वनपरिक्षेत्र
अधिकारी, गडचिरोली ( प्रादे.), विजय कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निमूर्लन, गडचिरोली एम.के.सिडाम, क्षेत्रसहाय्यक, गुरवळा, गुरु वाढई, वनरक्षक, गुरवळा तसेच गुरवळा नेचर सफारी येथील संपुर्ण गाईड यांनी सहकार्य केले.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश ठळक असल्यामुळे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांची हालचाल टिपता येते. तसेच कोणते प्राणी पाणी पिण्यासाठी आले, त्यांची एकूण नोंद ठेवता येते. पाणवढ्यावरील गणनेमध्ये पाणी पिण्यासाठी आलेल्या सर्व वन्यप्राण्यांची नोंद करून त्यावरून एक ढोबळ अंदाज करता येतो. प्राणी गणनेमध्ये ‘कॅमेरा ट्रॅप’ हा एक भरवशाचा आणि खरेखुरे चित्र समोर ठेवणारा प्रकार आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी काम करणारे सेन्सर असणारे (नाइट व्हीजन सेन्सर) कॅमेरे विविध भागात बसवले जातात. कॅमेरा समोरून प्राणी गेल्यास हे सेन्सर कार्यरत होतात व त्या प्राण्याचे छायाचित्र टिपतात. या सर्व छायाचित्रांची पाहणी तज्ज्ञांमार्फत केली जाते.

डॉ. किशोर मानकर 

 वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त,

 

 

 

 

 

Aditya ThackareyGadchiroli SP Ankit GoyalLead newd dr kishor mankar