वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुक रिंगणात श्रमजीवी संघटना पूर्ण ताकदिने उतरणार

कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्या सूचना 
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

उसगाव दि.११ जून:  वसई विरार महापालिका निवडणुकाचे पडघम वाजू लागले असताना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता या महानगर पालिकेच्या निवडणुक रिंगणात श्रमजीवी संघटना पूर्ण ताकदिने उतरणार आहे. आज श्रमजीवी संघटनेच्या उसगाव डोंगरी येथील मुख्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने महापालिका निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे.

वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्या अध्याक्षतेखाली संघटनेच्या उसगाव डोंगरी येथील श्रमजीवीच्या मुख्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाच्या बैठक झाली.

या बैठकीत एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात श्रमजीवी संघटनेचे कार्य ग्रामीण भागासोबतच महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय ठरल्यामुळे संघटनेकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. तसेच कामगार संघटनेच्या माध्यमातून देखील कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याने श्रमजीवी संघटनेबाबत लोकांमध्ये विश्वास वाढला आहे.

त्यामुळे नेहमी लोकांच्या प्रश्नावर आंदोलनच्या भूमिकेत असलेल्या संघटनेने महापालिकेच्या निवडणुक रिंगणात उतरून लोकांचे प्रतिनिधित्व करावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. म्हणून या विषयी विचारमंथन करून सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून अखेर महापालिकेच्या निवडणुक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी म्हटले आहे.

पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्या अध्याक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत जि.प.सदस्य आणि पालघर जिल्हा सरचिटणीस गणेश उंबरसाडा, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल, खजिनदार महेश धांगडा, तालुका अध्यक्ष गणेश भुरकुंड, माजी नगरसेविका श्रीम.अनिता धांगडा, संघटनेचे तालुका सचिव एकनाथ कलिंगडा, दिलीप लोंढे, तालुका महिला प्रमुख संजीवनी सुरुंदा, तालुका उपाध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह तालुक्यातील इतर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्तीत होते.

 

lead newsshramjivi Sanghatana