आज जाहीर होणार दहावीचा निकाल

आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 2 जून- इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष SSC RESULT 2023 च्या निकालाकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. आज (02 मे) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.

आज दुपारी 1 वाजता जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. http://mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org आणि http://ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

SMS च्या माध्यमातून असा बघा निकाल

विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे.

त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल.

यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आहे.

यानंतर आपला Seat Number टाईप करायचा आहे.

यानंतर हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे.

 

resultssc