धक्कादायक! गर्भवती महिलेचे बाळ झोळीतच दगावले

ठाणे जिल्ह्यातील हृदयद्रावक कहाणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

ठाणे, दि. ४ सप्टेंबर :  ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ते अनेक वर्षं ठाणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख होते. त्यामुळे त्याना ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या लोकजीवनाची चांगली माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये आरोग्य सेवे अभावी जुळ्या बालकांचा मृत्यू एका मातेला आपल्या डोळ्यांदेखत पहावा लागला.

ही घटना ताजी असतांना आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील धरणाचा पाडा येथे एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू असल्याने रस्त्याच्या दुर्दशेमुळे गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यंत नेत असतानाच तिची वाटेत झोळीतच प्रसूती झाली. परंतु रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तिला वेळेवर आरोग्य केंद्रात नेता आले नाही. आणि तिच्या नजरेसमोरच तिचे मूल झोळीतच दगावल्याचे तिला पहावे लागले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली आहे.त्या दुर्दैवी मातेचे नाव आहे दर्शना महादू परले.

आजहीआदिवासीना रस्त्यांअभावी आजारी माणसांना डोलीतून आरोग्य केंद्रात ब नेऊन उपचार करावे लागतात. त्यामुळे वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. परिणामी या आदिवासीना आपला जीव गमवावा लागतो.

शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही प्राथमिक सुविधांपासून आदिवासी वंचीत आहे. अत्यन्त खेदाची बाब आहे.लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी समन्वयाने आदिवासी विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.

हे देखील वाचा : 

बेघर मुलांना आधार कार्डची सक्ती.

अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची अभूतपूर्व कामगिरी.

 

child deathPregnant WomanThane DistrictXM Eknath Shinde