14 महिन्यांनी अनिल देशमुखांची सुटका

मला खोट्या आरोपांत फसवलं, माझा न्यायदेवतेवर विश्वास, जेलमधून सुटल्यानंतर देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 28, डिसेंबर :-  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख हे तब्बल 14 महिन्यांनी जेलबाहेर आले आहेत. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली, यानंतर अनिल देशमुख यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलंय. न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवसांनी मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आलेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जवळपास 14 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आलेत. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुरुंगाबाहेर जमले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना पेढे भरवण्यात आले आहेत, तसेच अनिल देशमुखांनी संविधान उंचावून उपस्थितांना साद घातली.

हे देखील वाचा :-

100cored issueAnil Deshmukhcbincp