डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थामार्फत माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ नोव्हेंबर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) जिल्हा गडचिरोली च्या वतीने माविम कार्यलय गडचिरोली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष  सखी लोक संचालित साधन केंद्र गडचिरोली (CMRC) येथील अश्विनी जांभूळकर  होत्या. तर प्रमुख अतिथी प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर, माविम चे जिल्हा समन्वयक सचिन देवतळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच नक्षलग्रस्त दुर्गम भागातील  विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी बार्टी मार्फत MPSC, IBPS, व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरु करण्यात आले असल्याने दुर्गम, डोंगराळ भागातील तरुणापर्यंत जाणीव जागृती व्हावी त्यासाठी बार्टी चा मोठा प्रयत्न आहे. यासोबत विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन संविधान दिनाच्या निमित्ताने  गणवीर यांनी केले.

त्यानंतर कोरोना काळात एकल झालेल्या महिला बाबत सखी CMRC च्या माजी सचिव ज्योतीताई मेश्राम यांनी थोडक्यात माहिती दिली.  या कार्यक्रमात माविमचे कार्यक्रम समन्वयक सचिन नरुले, माविमचे कर्मचारी, बचत गटाच्या महिलासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येत उपस्थित होती.

हे देखील वाचा :

 

पाच वर्षीय वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली खळबळ

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!

कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व संस्थांना होणार दंड. सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

 

 

Bartilead news