आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील खड्डे १५ दिवसात बुजवा. खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली:- दि. ९ ऑक्टोबर: आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडलेले असून वाहन चालकांना ये- जा करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर ३ ते ५ फुटाचे लांब खड्डे पडलेले असल्याने दीड- दोन तासांच्या रस्त्यावर सिरोंचाला जाण्यासाठी तब्बल ४ तास लागत आहेत.

सदर रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याने वाहन धारकांना १०० ते १२५ किलोमीटरचा फेरा करून तेलंगाणा- मंचेरीयल मार्ग प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याने  नागरिक त्रस्त झाले आहेत. याची गंभीर दखल खा. अशोक नेते यांनी घेतली असून येत्या खड्डे १५ दिवसात बुजवून रस्ता जाण्यायोग्य करण्यात यावा असे निर्देश खा.  नेते यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आज ९ ऑक्टोबर रोजी खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, महामार्गाचे कंत्राटदार किशोर गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली-चामोर्शी महामार्ग १५ दिवसात पूर्ण करा-खा.अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

गडचिरोली- चामोर्शीया राष्ट्रीय महामार्ग चे बांधकाम दीड वर्षांपासून सुरू असून अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना आवगमन करतांना त्रास होत आहे. तसेच गोविंदपूर गावाजवळील दोन्ही पुलाचे कामही अपूर्ण आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या नाल्यावरील रपटा पावसामुळे अनेकदा वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन सदर पुलाचे काम  महिन्यात पूर्ण करून सदर मार्गाचे काम 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.

 

हे देखील वाचा,

मोठी बातमी,एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर,राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागामध्ये वाढ.

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याचा आदेश हायकोर्टाने केला रद्द.

दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम.

Clead stori M Uddhav ThakareyMP Ashok Nete