धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी : पश्चिम रेल्वे च्या दादर रेल्वे स्थानकावर एक धावती रेल्वे पकडताना पडलेल्या प्रवाशाला दोन होमगार्ड मुळे जीवनदान मिळाले आहे.

दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर रात्री विरार स्लो लोकल आली होती. ही लोकल सुरू झाली आणि ती धावती लोकल पकडण्याचा एक तरुणाने प्रयत्न केला. मात्र त्याचा हात सटकला आणि तो लोकल खाली जाऊन पडला.

याच वेळी या ठिकाणी कर्तव्यावर असलेले गणेश कोरडे या होमगार्ड ने धाव घेतली, त्याच्या मागे दीपक साकोर्डे या होमगार्ड ने ही धाव घेतली. त्यांनी या लोकल खाली जात असलेल्या प्रवाश्याला मागे ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. त्याला जेजे रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या दोन्ही होमगार्ड चे कौतुक करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : 

जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक

गडचिरोली : ३० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, जिल्हयात आज ८८ कोरोनाबाधित तर ३० कोरोनामुक्त…

 

 

dadar railwaylead news