Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • आर्वी येथील डॉ.कदम यांच्या घरी मिळाले काळविटाचे कातडे.
  • मिळालेले कातडे मादी काळविटाचे असल्याची प्रथमदर्शनी वनविभागाच्या अधिकार्‍यांची माहिती.
  • डॉ. कदम हॉस्पीटलमध्ये पोलिसांकडून गर्भपात प्रकरणात झडती सुरू होती.
  • त्यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी मिळाली.
  • वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी कातडी जप्त केली.
  • कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्यानंतर कातडी कशाची आहे.
  • किती जुनी आहे ही बाब स्पष्ट होईल.

वर्धा, दि. १५ जानेवारी : आर्वी येथील डॉ. कदम हॉस्पीटलमध्ये तपासणीदरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी हॉस्पीटल गाठून कातडी जप्त केलीय. काळविटाची कातडी आढळल्याने एकच खळबळ जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आर्वी येथील डॉ. कदम हॉस्पीटलमध्ये गर्भपात प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्र सांगतात. यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी आढळून आली. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या चमूनं पंचनामा करत कातडी जप्त  केली आहे.

प्रथमदर्शनी ही कातडी मादी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ही कातडी कशाची आणि किती जुनी आहे, ही बाब स्पष्ट होईल, असं वनविभागाचे अधिकारी नितीन जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेमुळं गर्भपात प्रकरणात पुन्हा खळबळनजक प्रकार पुढं आलाय. यामुळं डॉ. कदम यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. वनविभागानं याप्रकरणी वनगुन्हा नोंद केलाय. तपासात काय बाबी पुढं येतात, याकडं सर्वांचं लक्ष वेधले आहे.

हे देखील वाचा : 

धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ

शिवसेना भविष्यात यूपीएच्या घटक होईल – मंत्री विजय वडेट्टीवार

 

Comments are closed.