Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. १५ जानेवारी :  बीड मध्ये पोलिसांचा हप्ते वसुली चा विडिओ व्हायरल झाला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉस्टेबल बाबू पवार यांचा एक व्हीडिओ बीड जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला आहे . एका रिक्षावाल्याकडून पवार हे पैसे घेत आहेत आणि ते एका कागदावर टिपून ठेवत असल्याचे त्यात दिसत आहे. हजार रुपये दे यांची बऱ्याच जणांकडून गोळा करायचं..पैशे खिशात घालताना देखील दिसून येत आहे. कार्यकारी अभियंताच्या टक्केवारी घेणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर चक्क आता पोलीस प्रशासनात कशा पद्धतीने हप्ते वसुली करते याचा उदाहरण समोर आला आहे यामुळे बीडमध्ये चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माजलगाव शहरातील पॉइंटवरील रिक्षा वाल्यांच्या माहितीनुसार पोलीसांकडून रिक्षा चालकांना हप्ता वसुलीसाठी अव्वाच्या सव्वा रुपये मागण्यात येतात. त्यांचा त्रास असह्य झाल्यानेच हा व्हीडिओ रिक्षाचालकाने काढला आहे पोलीसांच्या सुरु असलेल्या हप्ता वसुलीमुळे पोलीसांचा नैतिक धाकच संपून गेलेला आहे.

व्हायरल व्हीडिओमुळे पोलीस कशाप्रकारे वागत आहेत याचा पुरावाच मिळालेला आहे. चार दिवसापूर्वी हा व्हीडिओ माजलगावच्या रंगोली कॉर्नरवर शूट करण्यात आलेला आहे. व्हीडिओतील पोलीस कर्मचारी बाबू पवार ज्या पध्दतीने हप्ता मागत आहेत ती पध्दत पाहता पवार किती निर्ढावलेले आहेत हे दिसून येते. या व्हिडिओ संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारले असता दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी उत्तर दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

गडचिरोली : ३० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, जिल्हयात आज ८८ कोरोनाबाधित तर ३० कोरोनामुक्त…

जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक

 

 

Comments are closed.