Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक

गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,१४ जानेवारी : एत्तापल्ली तालुक्यात येत असलेल्या पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. १४/०१/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोलिस स्टेशंन पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ १९१ बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.

विवो: नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहीवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय ३० वर्षे पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र. १४ च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तो गट्टा दलमचा सदस्य तसेच नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सन २००८ रोजी पोस्टे भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता, उपपोरटे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन २०१० रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहीवासी चुक्कु याच्या खुनात सक्रीय सहभाग होता. सन २००९ रोजी उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील मौजा गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता.

त्याचबरोबर दि. १४/०८/२०२० रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता. दि. ११/०६/२०२० रोजी किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन २०२१ मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅकमध्ये तसेच दि. १८/०९/२०२१ मध्ये रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये, दि. २६/०२/२०२१ रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व दि. ०३/०४/२०२१ रोजी रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता तसेच दि. ११/०१/२०२२ रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता. जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असुन त्याच्यावर खालील प्रमाणे एकुण १६ गुन्हे दाखल होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर ०२ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे. सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पडले.

मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा ,

खा. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे दुसऱ्या पक्षाने घेऊ नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला

Comments are closed.