ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे दुसऱ्या पक्षाने घेऊ नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंदिया, दि. १३ जानेवारी : येत्या १४ फेब्रुवारी ला गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार असून या ठिकाणी काँग्रेस स्व बळावर लढ असुन सध्या १७ जागेवर काँग्रेस ने आपले उमेदवार जाहीर केले आहे. यावर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, आम्ही गोव्यात काँग्रेस ला १० जागा मागितल्या आहेत. ज्या ठिकाणी मागील ५० वर्षापासून काँग्रेस नी त्या १० जागा कधी जिंकल्या नाही. अशा जागांची मागणी शिवसेनेचे संजय राऊत यांनी केली असल्याचे बोलले. यावर महाराष्ट्र चे काँग्रेस प्रदेशा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाला घ्यायचे असतात. दुसऱ्या पक्षाचे निर्णय इतर पक्ष घेत असतील, हा गैर समज त्यांनी काढावा, असा टोला नाना पटोले ( Nana Patole ) यांनी संजय राऊतांना लगावला.
हे देखील वाचा :
पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदारासह दोन पोलिसांवर गुन्हे दाखल
Comments are closed.