Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरकुल लाभार्थ्यांची उर्वरित हप्ते तात्काळ द्या – नगरसेवक मिलींद खोब्रागडे

आरमोरी नगर परिषद घरकुल विभाग वाऱ्यावर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १५ जानेवारी : आरमोरी नगर परिषद च्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाचे त्यांच्या कामानुसार बाकी असलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्यांना द्यावे अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केलेली आहे.

नगरपरिषद होण्यापूर्वीपासून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्या लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना बऱ्याच दिवसानंतर त्यांची प्रकरणे मंजूर होऊन प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीत नावे आली. त्यानंतरही बर्‍याच दिवसांनी त्यांचे कागदपत्रे आणि इतर चौकशी करून घरकुल बांधकामाचे आदेश दिले गेले. त्यातही काही लोकांच्या अडचणी असून बरेच घरे बांधकामाला सुरुवात झालेली नाही. पण ज्यांची कागदोपत्री पूर्णपणे प्रकरणे मंजूर झाली अशांची घरे चालू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बऱ्याच लोकांची पूर्ण घरे बांधून झाले, तर बहुतेक लाभार्थ्यांच्या घरकुलांचे कामें सुरू आहेत, ज्यांची पूर्ण गहरे बाँधून झालित आणि ज्यांचे कामें सुरु आहेत, अशांचे बऱ्याच प्रमाणात बांधकामांच्या निधीचे हप्ते बाकी आहेत. अशा लाभार्थ्यांच्या रोज नित्यनेमाने नगर परिषद कार्यालयात बिलांसाठी येरझाऱ्या चालू आहेत.

अशी परिस्थिती असतानाच मात्र नगर परिषदेतील घरकुल विभाग अभियंता यांना लाच प्रकरणात अटक झाली, त्यानंतर त्या विभागाला अजून पर्यंत मुख्य अभियंत्यांची निवड नगरपालिकेला विनंती करूनही केल्या गेली नाही, एवढेच नाही तर सदर विभागाचे विभाग प्रभार नगरपालिकेतील दुसऱ्या कोणता अभियंता यांच्याकडे सोपवीला गेला नाही. म्हणजेच अजूनही घरकुल विभाग वाऱ्यावरच असल्याने सध्या स्थितीत ज्या लाभार्थ्यांची घरकुल बांधकामाची कामे सुरू होती, त्यांना हप्ते न मिळाल्याने पूर्णपणे कामे बंद पडली आहेत, तर रोजगारांना पैसे वेळेवर मिळत नसल्याने, रोजगार काम करायला तयार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशातच लाभार्थ्याने बांधकामाकरिता आणलेला कच्चामाल रेती,विटा, मुरूम, सिमेंट हा रस्त्यावर पडला असल्याने फार मोठ्या प्रमाणात त्यांची नासधूस होत आहे. त्यातच निसर्ग कोपल्याने, अवेळी आलेल्या पावसामुळे अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . एवढेच नाही तर काही लाभार्थी किरायाच्या घरात राहत असल्याने बांधकामाला होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्यावर अधिकचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे आपण तात्काळ घरकुल विभागाच्या अभियंत्याची नियुक्ती करावी किंवा आपल्या नगरपरिषद विभागात असणारे बांधकाम अभियंता यांच्याकडे त्या विभागाचा प्रभार देऊन ज्या लाभार्थ्यांची हप्ते रोखलेली आहेत, अशांची त्वरित बिले देऊन त्यांना पुढील बांधकाम सुरू करण्यास सहकार्य करावे व त्यांचे होणारे नुकसान टाळावे यासाठी प्रयत्न करावे. आपण ही समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी आणि सूचना नगरपरिषदेचे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी पत्राद्वारे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना केलेली आहे.

हे देखील वाचा : 

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

 

 

Comments are closed.