Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना भविष्यात यूपीएच्या घटक होईल – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा, दि. १५ जानेवारी : आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत, त्यांमुळे गोवा व इतर राज्यात युती बाबत कांग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. कोणाशी युती केल्याने कोणाची जागा वाढेल हे येणारी निवडणुक ठरवेल असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

गोव्यात कॉंग्रेसला अति आत्मविश्वास नडणार असून गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या टोला संजय राऊत यांनी केल्या नंतर संजय राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत चांगलाच समाचार घेतला आहे. ते भंडाऱ्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रचार दरम्यान बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संजय राउत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्याच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे सूचक विधान ही वड्डेट्टीवार यांनी केला असून संजय राउत यांच्या वक्त्वयाचा कोणताही फरक पड़त नसल्याचे वड्डेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. शिवसेनेशी आमची युती ही केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पक्ष वाढविण्यासाठी अश्या प्रकारे भूमिका मांडत असतात. त्यामुळे एक गोव्यात युती झाली नाही तर आमच्या पक्षाला त्याचा कुठलाही फटका बसणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवसेनेला UPA मध्ये समाविष्ट करून घेण्यासंबधी लोकसभेच्या निवडणुका लागताच कांग्रेस हायकमांड निर्णय घेईल असे सूचक वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी केले असून महाविकास आघाडी सरकार ला महाराष्ट्रात २ वर्ष पूर्ण होत असतांना UPA मध्ये शिवसेनेला समाविष्ट न केल्या बाबत ते बोलत होते.

भाजप आणि केलेल्या भ्रष्टाचाराला दूर राहण्यासाठी महा विकास आघाडी चा जन्म झाला. केंद्रामध्ये या भ्रष्टाचारी भाजपाला दूर साधण्यासाठी भविष्यात शिवसेना ची यूपीएचा घटक होईल. संजय राउत यांच्या कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेटीगाठी होत असून लवकर शिवसेनेचा UPA मध्ये समाविष्ट होणार असल्याच्या विश्वास व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : 

धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ

 

Comments are closed.