धक्कादायक: महाराष्ट्रात १७ महिन्यांत तब्ब्ल २२ हजार ७५१ बालमृत्यू. 

नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त बालमृत्यू... 
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ओमप्रकाश चुनारकर, मनोज सातवी 

मुंबई, दि. १६ जुलै: राज्यात जानेवारी २०२१ ते मे २०२२ या १७ महिन्यात ० ते ५ वर्ष वयोगटातील एकूण २२ हजार ७५१ बाळ मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या कडून समर्थन या संथेला माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीतून हि धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.  

राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण २२ हजार ७५१ बाल मृत्यूपैकी १९ हजार ६७३ अर्भक मृत्यू (० ते १ वर्ष ) असून, ३ हजार ०७८ एवढे १ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सदर आकडेवारीमध्ये राज्यात सर्वात जास्त नागपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात १ हजार ४४० अर्भक मृत्यू तर, १ ते ५ वर्ष वयोगटातील ३०१ बालकांचा असा एकूण १ हजार ७४१ बालकांच्या मृत्यूचा समावेश आहे. त्याच खालोखाल औरंगाबाद मध्ये १३४९, मुंबई मध्ये १३१७, नाशिक मध्ये १ हजार १२७ तर, पुण्यामध्ये १ हजार ८१ इतके बाल मृत्यू झाले आहेत.

विशेष म्हणजे बालमृत्युच्या आकडेवारीत पहिले पाच जिल्हे हे राज्यातील प्रगत जिल्हे असून बाल मृत्यूची संख्या याच पाच जिल्ह्यात जास्त असणे हि अतिशय गंभीर बाब आहे.

बालमृत्यूची करणे अनेक असली तरी त्याचे मूळ हे कुपोषणातच आहे. त्यामुळे टास्कफोरर्स सारख्या कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन करून त्याची राज्यात प्रभावी अंलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे हि चिंतेची बाब आहे. हे रोखण्यासाठी शासनाने यावर त्वरित ठोस उपपयोजना आखणे आवश्यक आहे. असे मत समर्थन संस्थेच्या स्नेह घरत यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा: 

 

नीट साठी प्रशासनाकडून बसेसची सुविधा

 

मुंबईतल्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ .. https://loksparsh.com/top-news/molestation-case-registered-against-officials-of-haffkine-biopharmaceutical-corporation-limited-in-bhoiwada-police-station-mumbai/27580/

CM eknath shindeDCM Devendra FadnavisHelth sectorlead newsmaharashtra governamentmaharashtra helthnagpur helth department