केंद्रीय राखीव पोलीस बल ३७ बटालियन तर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३० जानेवारी : नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, आदिवासी, अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कोटी या गावात केंद्रीय राखीव पोलीस बल ३७ बटालियन तर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन दि. २९ जानेवारी रोजी करण्यात आले होते

या वैद्यकीय शिबिरात कोठी व आसपासच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील २०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. उपस्थिती असलेल्या नागरिकांना औषधांचे मोफत वाटप केल्याने नागरिकांनी  पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले असून सर्वत्र ग्रामस्थांकडून कौतुक केल्या जात आहे.

नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षल चळवळीत सहभागी न होता नक्षल्यांपासून दूर राहून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे हा उद्देश समोर ठेऊन केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ३७ चे कमांडंट एम. एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जी/३७ वी वाहिनी CRPF चे कंपनी कमांडंट, रीजेश राज असिस्टंट कमांडंट यांच्या नेतृत्वात भामरागडच्या प्रादेशिक रुग्णालयाचे डॉ. अवस्थी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर शिबिराचे आयोजन कोटी या गावात करण्यात आले.

या वैद्यकीय शिबिरात सहाय्यक कमांडंट रिजेश राज यांच्या व्यतिरिक्त कोठीचे पोलीस स्टेशन प्रभारी संजय जराड (PSI), गणेश झुंजुर्डे (PSI), स्थानिक उपसरपंच लालसू हेडो, कान्हा हेडो, गावचे पाटील आणि कोठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मडावी आणि कोठी पोलीस ठाण्यात तैनात असलेले CRPF आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!

भीषण अपघात: कार-कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

 

 

CRPFlead news