३५ लाख जवानांना मोदी सरकारने दिले दिवाळी भेट,

जवानाप्रति मोदी सरकारचा मोठा निर्णय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली दि,६ नोव्हेंबर : आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील सर्व केंद्रीय जवानावासह  त्यांच्या परिवारांना मोफत आणि कॅशलेस उपचार घेता येणार आहेत . याशिवाय आयुष्मान भारत अंतर्गत मान्यताप्राप्त कोणत्याही सीजीएचएस हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचारांच्या सुविधेचा लाभ मिळू शकणार आहेत,

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनएसजी जवानाला आयुष्मान कार्ड देऊन या योजनेची सुरुवात केली. केंद्रीय निमलष्करी दलाच्या सर्व ३५ लाख जवानांना दि. ३१ डिसेंबरपर्यंत आयुष्मान कार्ड देण्याचे गृह मंत्रालयाने लक्ष्य ठेवले आहे.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सात केंद्रीय निमलष्करी दले आहेत. यामध्ये NSG, आसाम रायफल्स, ITBP SSB, CISE, BSF आणि CRPF यांचा समावेश आहे.

या सर्व जवानांना राष्ट्रीय स्तरावर आयुष्मान सीएपीएफ योजना सुरू करताना अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारने नेहमीच सुरक्षा दलांच्या हिताची काळजी घेतली असून तो त्या साखळीचा एक भाग आहे.

या योजनेंतर्गत केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व सेवारत कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यां परिवारांना देखील लाभ होणार आहे . गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी संयुक्तपणे ही योजना तयार केली आहे.

आयुष्मान CAPF योजनेच्या लाभार्थ्यांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास गृह मंत्रालयाने टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १४५८८ जारी केला आहे. यासोबतच ऑनलाइन तक्रारीची प्रणाली तयार करण्यात आली असून, त्यामुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे त्वरित निराकरण होणार आहे. अमित शहा यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात आसाममधून या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. यानंतर डिसेंबरपर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत साडेसात लाख कार्ड देण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र नंतर त्यात वाढ करून सर्व ३५ लाख जवानांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे देखील वाचा,

पत्नीने पोटच्या ५ लेकरांची केली निर्घृण हत्या; पती चे परस्त्री वर संबंध होते म्हणून ती गंगे

केवळ ‘लिव्ह इन’ रेलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार!

… त्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू ! आंघोळीला जाणे बेतले जीवावर

नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!

amit shahaLead news pm narendra modirajnat sing