भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 23 नोव्हेंबर :- पालघर मध्ये आज पुन्हा पहाटे चार वाजून चार मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. पालघर जिल्ह्यात डहाणू , तलासरी, बोर्डी, कासा , उर्से या साधारण 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात हा भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला असून या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने पालघर मधील विशेषतः डहाणू आणि तलासरी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पालघर मध्ये मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे लहान मोठे हादरे सुरूच असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सतत बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे येथील घरांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . तसंच सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीच वातावरण पसरलं आहे.

हे देखील वाचा :-

राज्यपालांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पुतळा जाळून निदर्शने

आता.. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा होणार ‘आदर्श’ !

3.6 magnitudeDahanuMild earthquakepalgharTalasari