सचिवांना दिलेले अधिकार काढले ! सरकारचा झाला निर्णय 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. १७ सप्टेंबर : मंत्रिमंडळ विस्ताराला होण्यापूर्वी कामांना वेळ लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ जाहीर होवून १८ आमदारांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे सचिवांचा कार्यभार मंत्र्यांकडे सोपवण्यात आला. सचिवांना दिलेल्या अधिकारांमुळे त्यावेळी सरकारवर टीकाही झाली होती की, मंत्रालय आता सचिवालय झाले आहे.

मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर खाते वाटप ही झाले, त्यामुळे सचिवांकडे असलेला कार्यभार आपोआपच मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मंत्र्यांकडे कार्यभार सुपूर्द करण्यात आल्यामुळे आता मंत्रालयातील कारभाराला गती येईल, अशी अधिकारी वर्गाला आशा आहे.

हे देखील वाचा :

कातकरी बांधवांची पिळवणूक .

 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची अवघ्या शिक्षण व्यवस्थेवर शंका.

 

Devendra FadanvisEknath Shinde