UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; देशातून श्रुती शर्माने मिळवला ऑल इंडिया रँक 1

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, 30 मे : UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा (UPSC Mains Exam 2022) 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत (UPSC Interview 2022) ही शेवटची फेरी होती. त्यानुसार आता UPSC 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

UPSC तर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. Indian Administrative Service; Indian Foreign Service, Indian Police Service and Central Services, Group ‘A’ and Group ‘B’ या विभागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर मुलाखतीच्या सर्व परीक्षा पास करून UPSC तर्फे देशातून 685 उमेदवारांना अपॉईंट करण्यात येणार आहे.

यामध्ये 244 उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत तर 73 उमेदवार हे EWS प्रवर्गातील आहेत. 203 उमेदवार हे OBC प्रवर्गातील आहेत तर 105 उमेदवार हे SC प्रवर्गातील आहेत. ST प्रवर्गातील 60 उमेदवार आहेत असे एकूण 685 उमेदवार हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी अपॉईंट करण्यात येणार आहेत. तसंच UPSC तर्फे 63 उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवण्यात आलं आहे.

आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. या वर्षी सर्व टॉप तीन पोझिशन्स मुली उमेदवारांनी मिळवल्या आहेत. श्रुती शर्माने केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे.
श्रुती शर्मा ही उत्तर प्रदेशच्या बिजनोरची रहिवासी आहे. तिने दिल्लीमधील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तिचा विषय इतिहास होता.   तर दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून (JNU) आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं
ती शर्मा दोन वर्षांपासून जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादामधून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होती.
निकाल आल्यानंतर श्रुतीच्या घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे.

यूपीएससी निकालाचं वैशिष्ट्य
2021 च्या यूपीएससी निकालाचं हे मोठं वैशिष्ट्य यंदा पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे.

महाराष्ट्रातील 40 उमेदवार उत्तीर्ण
यावर्षी 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 40 हून अधिक उमेदवारांना यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने 248 वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने 451 वा आणि अश्विन गोळपकरने 626 वा क्रमांक पटकावला आहे.

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले 10 विद्यार्थी

पहिला क्रमांक : श्रुती शर्मा
दुसरा क्रमांक : अंकिता अग्रवाल
तिसरं क्रमांक : गामिनी सिंगला
चौथा क्रमांक : ऐश्वर्य वर्मा
पाचवा क्रमांक : उत्कर्ष द्विवेदी
सहावा क्रमांक : यक्ष चौधरी
सातवा क्रमांक :सम्यक एस जैन
आठवा क्रमांक : इशिता राठी
नववा क्रमांक : प्रीतम कुमार
दहावा क्रमांक : हरकीरत सिंह रंधावा

 

हे देखील वाचा : 

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 16 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत विविध लाभाचे वितरण

देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन

 

lead news