कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 16 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत विविध लाभाचे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 30 मे : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ व सेवा तसेच कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वोत्कृष्ठ हित बालकास 23 वर्ष होईपर्यत संरक्षित करणेबाबत योजना आहे. आज आभासी पद्धतीने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपस्थितीत संपूर्ण देशासह जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथेही लाभार्थींना विविध लाभाचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला खासदार गडचिरोली-चिमूर क्षेत्र अशोक नेते, आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र धर्मरावबाबा आत्राम, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल कल्याण समिती सदस्य दिलीप बारसागडे, मनोहर हेपट, बाल न्याय मंडळ सदस्य सविता सादमवार, चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, प्रियंका आसुटकर, जयंत जथाटे, तनोज ढवगाये, रविंद्र बंडावार उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत सदर दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 16 अनाथ बालकांना मान्यवरांच्या हस्ते पीएम केअर्स या योजनेअंतर्गत रु.10 लक्षचे पोष्टाचे पासबूक आणि रु. 5 लक्षाचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड, तसेच अनाथ प्रमाणपत्र बालकांना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

पासबूक आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड, अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कोविड-19 महामारीमुळे दोन्ही पालक किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरु केली होती. मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि सरंक्षण यासाठी शाश्वत पद्धतीने त्यांची राहण्याची आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे. वयाची 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

हे देखील वाचा :

देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन

स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा जिद्द, संयम, इच्छाशक्ती ही अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक – उद्योजक भरत धोटे

ऐकावं ते नवलच ! बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा, चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला.

 

lead news