भयंकर बातमी: आर्थिक तंगी ठरली जीवघेणी …

व्यावसायिकाने कुटुंबीयांसह स्वतःला कारमध्ये जाळून घेतलं..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर 20 जुलै : आर्थिक विवंचनेला कंटाळून एका व्यावसायिकाने पत्नी आणि मुलासह स्वतःला कारसह पेटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. . या गंभीर आणि वेदनादायक घटनेत पत्नी आणि मुलगा बचावले आहेत. मात्र आग लावून घेणाऱ्या व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भयंकर बातमी: आर्थिक तंगी ठरली जीवघेणी …

मिळालेल्या माहितीनुसार, रामराज भट्ट हे व्यावसायिक गेल्या काही कालपासून आर्थिक विवंचनेत होते. काल ते पत्नी आणि मुलाला घेऊन बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कारमधून वर्धा रोडला घेऊन गेअत होते. त्यानंतर त्यांनी रस्त्यात अचानक कार थांबवून सोबत आणलेले पेट्रोल कारवार शिंपडून स्वतःमध्ये बसून कार पेटवून दिली.

या दुर्घटनेत कार चालक व्यावसायिक रामराज गोपालकृष्ण भट्ट (63) यांचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला. तर पत्नी संगीता भट्ट (57) आणि मुलगा नंदन भट्ट (25) हे गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर वाठोडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

bussness mancar burn sucidenagpur