महेश अहिर ह्यांची हत्या की आत्महत्या? बेपत्ता महेश अहीर यांचा मित्रासह आढळला मृतदेह, चंद्रपुरात खळबळ…

केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा पुतण्या होता महेश
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
हंसराज अहिर ह्यांच्या बंधुंचे काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते, त्यापाठोपाठ त्यांच्या वडील बंधूच्या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने अहिर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चंद्रपूर, 23 मार्च :- केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा पुतण्या महेश अहिर आणि मित्र हरीश धोटे घरच्यांना माहिती न सांगता निघून गेले त्यासंदर्भातील पोलिसा तक्रार दाखल करून परिवारही शोध घेत असताना चंदीगड पोलीसांनी सेक्टर 43 मधील कजेडी गावाजवळ जंगलात एकाच झाडाच्या फांदीला दोन युवक आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे माहिती देताच मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवड्यापासून दोन्ही मित्र घरातील कोणत्याही सदस्यांना माहिती न सांगता निघून गेले .  या संदर्भात दोन्ही युवकांच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महेश अहिर घरून निघून जाताना मोबाईल सह घरून मोठी रक्कम घेऊन गेला असल्याची  प्राथमिक माहिती आहे.

तर दुसरीकडे  केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा पुतण्या राजकिय वरदहस्त असल्याने पोलिसांनी  तपास चक्रे सुरू असतानाच चंदिगड पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना संपर्क करून चंदीगड सेक्टर 43 मधील कजेडी गावाजवळ जंगलात एकाच झाडाच्या फांदीला दोन युवक आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आज बुधवार रोजी देण्यात आली .

त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिांनी घटनेची माहिती दोन्ही कुटुंबाला दिली असून  झाडाच्या फांदीवर असलेले दोनही मृतदेह चंदीगड पोलिसांनी ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगितले आहे. नेमकी हत्या की आत्म्हत्या ?केली यावर समाज माध्यम तर्क वितर्क सुरू असले तरी काही महिन्यांपूर्वीच महेश यांच्या वडीलचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते, त्यापाठोपाठ मुलाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने अहिर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हंसराज अहिर ह्यांच्या पुतण्याच्या संशयास्पद मृत्यूने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

हे पण वाचा :-

Chandrapurcrime newshansraj aherharish dhotemahesh ahir