माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि. 31 मे : राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठा तर्फे विद्यापीठ परिसर ते जिल्हा सत्र न्यायालय परिसरापर्यंत सात दिवस माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह राबविण्यात येणार आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी पार पडले.

या प्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देव उपस्थित होते तसेच गणित विभागाचे प्रा. संदीप कागे, प्रा.डॉ. प्रिती काळे पाटील उपस्थित होते.शांत आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ वातावरण अतिशय महत्वाचे आहे परंतु मानवाच्या काही निष्काळजीपणामुळे आपले वातावरण दिवसेंदिवस अस्वच्छ होत आहे. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो , तसाच आपण आपला परीसर देखील स्वच्छ ठेवायला हवाय. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.प्रीती काळे पाटील यांनी स्वच्छता मानवी जीवनासाठी कशी महत्त्वाची आहे .हे अनेक उदाहरणे देत पाठवून दिले.
संदीप कागे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे यांनी तर आभार सह कार्यक्रम अधिकारी वैभव मसराम यांनी मानले.

हे देखील वाचा :

UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; देशातून श्रुती शर्माने मिळवला ऑल इंडिया रँक 1

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 16 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत विविध लाभाचे वितरण

 

lead news