आविस कार्यकर्त्यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागावे : जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भामरागड १८ ऑगस्ट : भामरागड येथील पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक आटोपल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भामरागड येथील सा. बां.विश्रामगृहात भामरागड तालुक्यातील आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन भामरागड तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा केले. आगामी येणाऱ्या भामरागड नगर पंचायत निवडणुकी संदर्भात सुध्दा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली . आविस कार्यकर्त्यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागावे असे प्रतीपादन त्यांनी केले

भामरागड तालुक्याचा विकासासाठी जिल्हा परिषद स्तरावरून विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही.आणि तालुक्यातील आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकनिष्टेतेत काम करून पक्ष बळकटीसाठी काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी उपस्थित आविस पदाधिकारी व कार्यकर्त्याना आवाहन केले आहे.

हे देखील वाचा :

 

आमदाराचे आश्वासन ठरले फोल,भूमिपूजन करून 3 वर्षे लोटूनही फराडा,फोकुर्डी रस्त्याची दुरव्यथाच..नागरिकांचा आमदाराप्रति रोष.

 

20 ऑगस्टला गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित

 

संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये कांदा लागवड करून घेतला

ajaykankdalwar