राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम !

लालबागच्या राज्याच्या मंडपात भाविक आणि पोलिस भिडले ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 31 ऑगस्ट :-  मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश सावरत असताना यावर्षी राज्यभरात आजपासून दहा दिवस चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा गणपती बाप्पा आले आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळी साडे चार वाजल्यापासून भाविकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांग लावली होती.

दरम्यान भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे काही भाविक, सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्यात तू तू मै मै झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते. आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून सर्वदूर आनंदी वातावरण आहे.

हे देखील वाचा :-

शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? गडचिरोलीकरांचा संतप्त सवाल..

 

croudfestival 2022ganesh festivallalbagmaharashtra