गडचिरोलीच्या पोलीस अधिकाऱ्याची काश्मीरमध्ये सुवर्ण कामगिरी…

23 व्या अखिल भारतीय पोलीस वाटर स्पोटर्स स्पर्धेत पटकावलं गोल्ड मेडल..!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 5 मार्च- जम्मु काश्मीर पोलीस आयोजित श्रीनगर येथे सुरु असलेल्या 23 व्या अखिल भारतीय पोलीस वाटर स्पोटर्स स्पर्धा 2023-24 मध्ये गडचिरोली पोलीस दलातील आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. अतिशय थंड (-1°ते -4°) इतक्या कमी तापमानात अतिशय कमी ऑक्सीजन मध्ये खेळल्या जाना­या Coxless Four 1000 मीटर या क्रिडा प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघाचे नेतृत्व करत सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्यांच्यावर गडचिरोली पोलीस दलासह राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गडचिरोली जिल्हा नक्षलवादामुळे अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवान हे या दुर्गम-अतिदुर्गम भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत आहेत. श्रीनगर येथे दि. 02 ते 08 मार्च 2024 दरम्यान सुरू असलेल्या 23 व्या अखिल भारतीय पोलीस वाटर स्पोटर्स स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी अतिशय यशस्वी कामगिरी करून गडचिरोलीसह महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे. त्यामुळे गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांनी संतोष कडाळे यांचे अभिनंदन केले करून त्यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत. संतोष कडाळे यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे गडचिरोली पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस दलामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

हे पण वाचा :-

साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष मुक्तता, जन्मठेपेची शिक्षाही रद्द..!

42 लाखांच्या एम.डी. ड्रग्स सह दोघांना अटक.

all india police water sportsCoxless Fourgadchiroli police