” जमाने का बडा अजीब दस्तूर है , जिते जी नही कि दोनो कि कदर जमाने से जाने के बाद आया रहम.’

जिवंतपणी पूर्ण करायची राहिलेली इच्छा, त्यां दोघांची मरणानंतर झाली पूर्ण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जळगाव,०२ ऑगस्ट :- म्हणतात प्रेम आंधळ असत प्रेमवीरांना प्रेमाच्या पुढे काहीच दिसत नाही. त्या प्रेमासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात .कधीकधी ते मिळवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्यासाठी ते मागेपुढे बघत नाही. आपल्या प्रियकराला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला ते जातात . रुपेरी पडद्यावर आपण सिनेमात याचे चित्रण बघत असतो . दोघा प्रेमियुगुलांच्या प्रेमाला त्यांचे कुटुंबीय आडवे येत असतात .प्रेमाला जात –पात ,धर्म, प्रांत ,भाषेच बंधन नसत हे सत्य नाकारता येत नाही.

 जिवंतपणी जे लोक दोघां प्रेमियुगुलांच्या मिलनाला आडवे आले विरोध केला त्यांनी मृत्यूनंतर मात्र या प्रेमी युगुलाची मिलनाची इच्छा पूर्ण केली. जिवंतपणी लग्नाला नकार देणाऱ्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर मात्र या प्रेमी युगुलाची विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी  स्मशानभूमीतच  विधीवत लग्न लावून दिले .मात्र याहून दुसरी मोठी शोकांतिका काय असेल जिवंतपणी त्या दोघांच्या प्रेमाची कदर त्या लोकांना करता आली नाही मात्र दोघांची मरणानंतर त्यांनी(कुटुंबीयांनी) पूर्ण केली केवढा हा मोठा विरोधाभास… 

!! जमाना बडा जालीम है प्यार करने वालों को जिने नाही देता हे खरच आहे. जमाने का बडा अजीब दस्तूर है !!

जिवंतपणी प्रेमविवाहाला विरोध झाला म्हणून प्रेमी युगुलाने आत्महत्या केली आणि मृत्यूनंतर स्मशानात विधीवत लग्न लावण्याची घटना जळगाव जिल्ह्यातील वाडे येथ घडली आ  हे.

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील वाडे येथील मुकेश सोनवणे आणि नेहा ठाकरे असं येथील प्रेमी युगुलांचं नाव आहे.जिवंतपणी लग्नाला नकार देणाऱ्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर मात्र या प्रेमी युगुलाची विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना अग्निडाग देण्याआधी स्मशानभूमीत विधीवत लग्न लावून दिले .

मयत नेहा ठाकरे (वय 19)आणि तिचे कुटुंब गेल्या काही महिन्यांपूर्वी वाडे गावात राहायला आले, गावातीलच राहणारा मुकेश सोनवणे (वय 22) यांच्यात प्रेम संबन्ध जुळले. याबाबतची दोघा कुटुंबियांना माहिती मिळाली. मुलांकडून मुलीच्या कुटुंबीयांकडे लग्नचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र मुलगा मुकेश हा नात्याने नेहाच्या चुलत मामा लागत असल्याने लग्नास नकार दिला .

नेहा चे दुसरीकडे आणि मुकेशचे दुसरीकडे लग्न लावण्यासाठी  संशोधन सुरू केले , म्हणून आपल लग्न होणार नाही स्पष्ट झाल्याने 1 आगस्ट म्हणजेच मैत्री दिवसाची निवड करत गावातीलच माध्यमिक विदयलयातील इमारतीतील लोखंडी सळईला दोरी बांधून  गळफास घेऊन आत्महत्या केली.

” मुकेश याने आत्महत्येपूर्वी व्हॅट्सअप वर ‘बाय’ असा मेसेज ठेवला होता, त्यानंतर पहाटे आत्महत्या केल्याचं समोर आलं घटनास्थळावरून चिठ्ठी तसेच इतर काही आढळून आलं नसल्याचं पोलिसांच म्हणणं आहे..!

हे देखील वाचा,

चार लाख दुरुस्तीसाठी खर्च करूनही जी.प शाळेतील वर्ग खोलीत गळत आहे पाणी

 

दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधान करणे हिच माझ्या कामाची पावती :जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

jalgaonwade coupalessucideleadstory