“त्या” ११ आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता त्वरित अदा करा

नगरपरिषद आरमोरी अंतर्गत येत असलेल्या ११ आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता त्वरित अदा करा - नगरपालिकेचे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांची नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आरमोरी, दि. ३१ डिसेंबर :  ग्रामीण भागातील आशा वर्कर, गटप्रवर्तक यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो, तर नागरी भागातील आशांना तेथील नगरपंचायत, नगरपरिषदच्या माध्यमातून देण्यात यावी. अशी तरतूद शासकीय परिपत्रका तून प्रसिद्ध केलेली आहे. परंतु आरमोरी नगर परिषदेच्या हद्दीतील येणाऱ्या ११ आशांना आत्तापर्यंत लाभ देण्यात आलेला नाही, त्यामुळे नगरपालिकेने त्यांच्यावर अन्याय न होऊ देता व कसलाही विलंब न करता प्रोत्साहनपर भत्ता तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी नगरपालिकेचे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

आरमोरी तालुक्यात एकूण ११० आशा वर्कर आणि गटप्रवर्तक काम करीत आहेत. त्यापैकी ९९ ग्रामीण भागात काम करत असून ११ आशा वर्कर व गटप्रवर्तक ह्या आरमोरी नगरपरिषद हद्दीत काम करीत आहेत.

नगरपरिषद स्थरावर सर्व आशा वर्कर गटप्रवर्तक कर्मचारी हे लोकांमध्ये जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महायुष सर्वे करणे, कोविड-१९ ची निगडित इतर कामे अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता करीत आहेत, वरील सर्व बाबी ह्या कामाचा भाग असला तरीदेखील हे कर्मचारी आपल्या जीवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या प्रतिव्यक्ती रुपये १०००/- इतकी प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्याबाबत विनंती केलेली आहे.

त्यामुळे त्यांना माहे एप्रिल २०२० पासून रुपये १०००/- मासिक याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आला नाही. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील आशा वर्कर यांना वरील मानधन बऱ्यापैकी देण्यात आलेला आहे, परंतु नगरपरिषद आरमोरी अंतर्गत येणाऱ्या ११ आशांना त्यांचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करून तसेच कोविड-१९ ही जागतिक महामारी असून यामध्ये जीवाची पर्वा न करता नागरी भागात काम करणाऱ्या सर्व आशा वर्कर व आशा गटप्रवर्तक हे जोखीम पत्करून काम करीत असल्याने त्यांना नियमित मानधन व्यतिरिक्त रुपये १०००/- इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात यावी. अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी  सुट्टीवर असल्यामुळे विभाग अधिकारी ओसीन मडकाम यांना निवेदनातून केली आहे.

हे देखील वाचा  : 

बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड

येत्या फेब्रुवारी महिन्यात ८ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन

 

 

 

 

 

lead news