लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
प्रतिनिधी – सचिन कांबळे
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
गडचिरोली, दि. ५ जून : जागतीक पर्यावरण दिन व आझादी का अमृत महोत्सव यांचे औचित्य साधुन गडचिरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका, चांदाळा रोड गडचिरोली येथे वृक्षारोपन, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी सोनल भड़के, सेवा निवृत्त विभागीय वनाधिकारी बिलोलीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज देंबरे, वासेकर, बोगा देगावे , विद्या उईके, वनपाल, अलोने, वनरक्षक, नितेश सोमलकर, तसेच कार्यलयीन कर्मचारी, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य रोपवाटीका परिसरात फळाचे रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याने कार्यालयीन कर्मचारी तसेच शहरातील आलेल्या नागरिकांनी आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवित साधारणता ६० ते ७० नागरिकांनी उत्स्फूर्त आरोग्य तपासणी केली,याशिवाय शिबिरात आलेल्या रक्तदात्यांनी रक्तदान करणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत
४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
यावेळी भोजराज गुरनुले, जनार्धन तुनकलवार, मारोती येलकुवेवार, राहूल कापकर, सतिश कारडे, विकास मडावी, विवेक अलोने, अक्षय मेश्राम, अक्षय मांढरे, राकेश सिकदर, अजितसिंग राठोड़, राकेश उड्डाण, दु्योधन कुकडे, मृत्युजंय विस्वास, नित्यांनंद दास, प्रमोद तोडासे, वासुदेव कडयामी, सुमित बर्डे, विनोद नेंचलवार,गणेश आखाडे, लोमेश तुंकलवार, खेमाजी नन्नावरे, महेश भांडेकर, लुकेश कुकडकर, दुर्योधन चापले, आदित्य लटारे, योगराज कोल्हे, निलेश धोडरे, महेद्र लटारे, निलकंठ वासेकर, कमलेश भगत, तुषार पिपरे, देवेद्र धुवे, ज्ञानेश्वर गावडे, धिरज ढेबरे, विपूल नैताम, चंद्रशेखर दुगा, महेश तडामी, प्रकाश पिपरे, सुशिल पिपरे, भुषन भुरसे, नरेद्र सोनी, योगेश तुलावी, दुर्वाकुर निकोडे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली .
या कार्यक्रमात रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे रक्तपेढीमध्ये वाढ होवून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा होण्यास मदत होईल.
पर्यावरण दिनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरीता रक्तपेढी गड़चिरोली येथील डॉ. साखरे , BTO मोहिणी कुटे, Tec., समता खोब्रागडे, जिवन गेड़ाम, निराशा राऊत, बालपंड़े , कविता वैद्य, श्रीकांत मोड़क यांनी सहकार्य केले. तर विशेष सहकार्य APEM टिम, गडचिरोली व स्वयं रक्तदाता जिल्हा समिती चे सचिव मनोज आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे देखील वाचा :
“हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी