Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने वृक्षारोपण,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन ..

सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोली च्या वतीने स्तुत्य उपक्रम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

प्रतिनिधी – सचिन कांबळे 

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. ५ जून : जागतीक पर्यावरण दिन व आझादी का अमृत महोत्सव यांचे औचित्य साधुन गडचिरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका, चांदाळा रोड गडचिरोली येथे वृक्षारोपन, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमाला  विभागीय वनाधिकारी सोनल भड़के, सेवा निवृत्त विभागीय वनाधिकारी बिलोलीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी धिरज देंबरे, वासेकर, बोगा देगावे , विद्या उईके, वनपाल, अलोने, वनरक्षक, नितेश सोमलकर, तसेच कार्यलयीन कर्मचारी, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमा प्रसंगी संबोधताना विभागीय वन अधिकारी सोनल भड़के यांनी सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले. मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. अशी पर्यावरण संदर्भात विस्तृत माहिती विभागीय वनाधिकारी सोनल भडके यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी वर्गांना दिली.

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य रोपवाटीका परिसरात फळाचे रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याने कार्यालयीन कर्मचारी तसेच शहरातील आलेल्या नागरिकांनी आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवित साधारणता ६० ते ७० नागरिकांनी उत्स्फूर्त आरोग्य तपासणी केली,याशिवाय शिबिरात आलेल्या रक्तदात्यांनी रक्तदान करणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत
४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

यावेळी भोजराज गुरनुले, जनार्धन तुनकलवार, मारोती येलकुवेवार, राहूल कापकर, सतिश कारडे, विकास मडावी, विवेक अलोने, अक्षय मेश्राम, अक्षय मांढरे, राकेश सिकदर, अजितसिंग राठोड़, राकेश उड्डाण, दु्योधन कुकडे, मृत्युजंय विस्वास, नित्यांनंद दास, प्रमोद तोडासे, वासुदेव कडयामी, सुमित बर्डे, विनोद नेंचलवार,गणेश आखाडे, लोमेश तुंकलवार, खेमाजी नन्नावरे, महेश भांडेकर, लुकेश कुकडकर, दुर्योधन चापले, आदित्य लटारे, योगराज कोल्हे, निलेश धोडरे, महेद्र लटारे, निलकंठ वासेकर, कमलेश भगत, तुषार पिपरे, देवेद्र धुवे, ज्ञानेश्वर गावडे, धिरज ढेबरे, विपूल नैताम, चंद्रशेखर दुगा, महेश तडामी, प्रकाश पिपरे, सुशिल पिपरे, भुषन भुरसे, नरेद्र सोनी, योगेश तुलावी, दुर्वाकुर निकोडे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली .

या कार्यक्रमात रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे रक्तपेढीमध्ये वाढ होवून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा होण्यास मदत होईल.

पर्यावरण दिनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरीता रक्तपेढी गड़चिरोली येथील डॉ. साखरे , BTO मोहिणी कुटे, Tec., समता खोब्रागडे, जिवन गेड़ाम, निराशा राऊत, बालपंड़े , कविता वैद्य, श्रीकांत मोड़क यांनी सहकार्य केले. तर विशेष सहकार्य APEM टिम, गडचिरोली व स्वयं रक्तदाता जिल्हा समिती चे सचिव मनोज आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

हे देखील वाचा : 

कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नि:संदिग्ध ग्वाही

राज्यात 6 जून “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार

“हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

 

Comments are closed.