म्हशींन दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म!

महाराष्ट्र-तेलंगणात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात ही नवलाई घडली.या रेडकुला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वृत्तसंस्था, दि. १८ सप्टेंबर : म्हैस काळीकुट्ट असते. तिने जन्मास घातलेले रेडकू देखील तिच्यासारखेच असते. मात्र संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावातील संजय येलमुले यांच्या म्हैशीनं चक्क पांढरं शुभ्र रेडकू जन्माला घातलं आहे. या रेडकूला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या रेडकूची शारीरिक स्थिती सुदृढ आहे. मात्र आज सकाळपासून हे पांढरं रेडकू दूध पित नसल्याने येलमुले कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. त्या रेडकूवर खाजगी पशु चिकीत्साकडून उपचार सुरू असल्याची माहिती संजय येलमुले यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र-तेलंगणात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात ही नवलाई घडली. गावातील संजय पंढरीनाथ येलमुले या शेतकऱ्याचा मालकीचा म्हशीनं शुक्रवारला चक्क पांढऱ्या शुभ्र पिल्लाला जन्म दिला. संजय पंढरीनाथ येलमुले हे शेतकरी आहेत. शेतीपुरक व्यवसाय म्हणून ते म्हैस पालन करतात. त्यांचाकडे तीन म्हैस आहेत. या तीन म्हशी दररोज बारा लिटर दुध देतात. यातून येलमुले यांना महिनाभरातून बारा हजार रूपयाची मिळकत होते.

हे देखील वाचा :

15 लाखांचं बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी अखेर जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

सचिवांना दिलेले अधिकार काढले ! सरकारचा झाला निर्णय