महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन.

खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपुर, 30 मे – महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा पासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान  दिल्ली तील मेदांता रुग्णालयात 3 वाजून 30 मिनिटानी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान बाळू धानोरकर यांचं पार्थिव सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपुरात आणण्यात येईल धानोरकर यांचे वरोरा येथील घरी दुपारी 2 वाजता पार्थिव शरीर आणण्यात येणार आहेत, अंतिम संस्कार 4 वाजता वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होणार आहे. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.

हे पण वाचा :-

रायगड जिल्ह्यात काळे धंदे पुन्हा सुरु

Balu Dhanorkarcongres MPgallbladdermah acongressPancreas