मुंबई पोलिसांना आता १५ लाखात मालकीची घरे

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा निघाला अध्यादेश; पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ३१ ऑगस्ट : मुंबईत वरळी, नायगाव, डीलाईल रोड याठिकाणी पोलिसांना त्यांची नोकरी असेपर्यंत राहण्यासाठी निवासी चाळी मुंबई विकास विभागाने दिल्या होत्या. पोलीस कर्मचारी निवृत्त झाला की घरे शासनाला परत करावी लागत. त्यामुळे आयुष्यभर पोलीस सेवा केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बेघर व्हावे लागे. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की काही एक रक्कम घेऊन हि घरे मालकीहक्काने पोलीस कर्मचाऱ्यांना ध्यावीत. म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने एक रक्कम ठरवली होती, मग पुढे ठाकरे सरकार आल्यावर ही रक्कम कमी करून २५ लाख करण्यात आली. परत हा निर्णय बदलत शिंदे सरकारने ह्या घरांच्या किंमती कमी करून २५ लाखावरून १५ लाख रक्कम करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती, आता या संबंधीचा अध्यादेश काढून बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेत पोलीस कर्मचाऱ्यांना ५०० चौरस फुटाचे घर १५ लाख रुपये घेऊन मालकी हक्काचे द्यावे असा निर्णय घेण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांना ही शिंदे सरकारने गणेशोत्सवाची भेट दिली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे देखील वाचा : 

आता तयार होणार हवेतून पाणी; मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम

राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम !

 

mumbai police