गणेशोत्सव देखाव्यावर पोलिसी कारवाई

कल्याण मधील घटना...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे, दि. ३१ ऑगस्ट : कल्याण मधील विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर देखावा केला होता. यावर पोलिसांनी आक्षेप घेत आज बुधवारी पहाटे या देखाव्यावर कारवाई केली.

शिवसेना म्हणजे त्याग आणि शौर्याचा इतिहास आहे. शिवसेना आहे म्हणून नवा इतिहास घडणार आहे. शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर आहे हे दाखविण्याचा प्रयत्न कल्याण मधील विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सव देखाव्यातून केला होता. यावर आक्षेप घेत पोलिसांनी कारवाई करून सामग्री ताब्यात घेतली.

या कारवाईच्या विरोधात विजय तरुण मंडळ न्यायालयात दाद मागणार आहे, असे समजते.

हे देखील वाचा : 

मुंबई पोलिसांना आता १५ लाखात मालकीची घरे

आता तयार होणार हवेतून पाणी; मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम