सी आय एस एफ जवानांचा अपघातात दुर्दवी मृत्यू

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ११ फेब्रुवारी :  चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर रोडवरील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे.. कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव चे रहिवासी आहेत..

मागील काही वर्षापासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापूर कडे जात होते, दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली, यामध्ये ते गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

त्यांचे पार्थिव शरीर हे सुनगाव येथे ९ फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले. त्यावेळी लोकांनी अंतिम दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. सुनगाव ते जळगाव रोडवरील त्यांच्या स्वतःच्या मळ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी बुलढाणा येथील जवानांनीअखेरची सलामी दिली व हवेत फैरी झाडल्या यावेळी प्रचंड जनसमुदाय एकवटला होता.

हे देखील वाचा :

“माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून, मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः “सरेंडर” झालो” – नितेश राणे 

“आम्ही सावित्री – फातीमेच्या लेकी, काय आम्हा कुणाची भीती”

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

 

 

buldhanaChandrapurlead news